कराड सोलर ऊर्जा
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रबिझनेसराज्यसातारा

कराड, मलकापूरसह ग्रामीण भागात धनसंपत्ती नागरी सहकारी पतसंस्था संजीवनी देईल : अध्यक्ष दत्ताराम देशमुख

आगाशिवनगरला धनसंपत्ती नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ उत्साहात

मलकापूर (हॅलो न्यूज) :- माणसाच्या जीवनात सुख, शांती आणि धनसंपत्ती असल्यास जीवन पूर्णत्वाकडे गेल्याचा आनंद मिळत असतो. आज विश्वासार्ह गुंतवणूक व ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कराड, मलकापूर शहरासह ग्रामीण भागातील अर्थवाहीनीला संजीवनी देण्यासाठी धनसंपत्ती नागरी सहकारी पतसंस्था काम करेल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताराम देशमुख यांनी व्यक्त केला.

कराड तालुक्यातील मलकापूर- आगाशिवनगर येथे धनसंपत्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूरचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी संस्थापक अध्यक्ष दत्ताराम देशमुख बोलत होते. यावेळी संचालक संदीप सावंत, रणजीत पवार, विश्वास देसाई,प्रतीक्षा देसाई, अर्चना देशमुख, शुभांगी सावंत, प्रियांका पवार, अश्विनी सावंत यांच्यासह संस्थेचे कर्मचारी व ठेवीदार, हितचिंतक उपस्थित होते.

संचालक संदीप सावंत म्हणाले, व्यवसाय असो की दैनंदिन गरज प्रत्येला पैशाची, धनाची गरज असते. आपली धनसंपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आपल्याला धनसंपत्ती मिळावी, यासाठी सेवा पुरवण्यासाठी धनसंपत्ती पतसंस्था यापुढील काळात कार्यरत राहील.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close