क्राइमताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक

पुसेसावळी दंगलीतील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात

सातारा | पुसेसावळी (ता. खटाव) येथील आक्षेपार्ह पोस्ट वरून दोन समूहात राडा झाला होता. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर पंधराहून अधिक लोक जखमी झाले होते. सातारा पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 37 जणांना अटक केली असून यामध्ये 20 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुसेसावळी प्रकरणातील दोन प्रमुख सूत्रधारांपैकी राहुल कदम या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली तर दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी आरोपींवर नुकसान, जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल केले आहेत. पुसेसावळी प्रकरणातील दोन प्रमुख सूत्रधारांपैकी काल राहुल कदम या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या पुसेसावळी येथील जनजीवन पूर्वपदावर आलेले असून पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी तर निर्दाेषांना त्यामध्ये गोवले जावू नये, अशी मागणी केली आहे.

Prithviraj Chavan's visit to Pusesavali

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली दोन्ही समाजाची भेट
पुसेसावळी । पुसेसावळी येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच मंडल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष झाकीर पठाण, फारूक पटवेकर, पुसेसावळी गावचे सुरेशबापू पाटील, माजी सरपंच दत्तात्रय रुद्रके, सोसायटी चेअरमन रवी कदम, तंटा मुक्ती अध्यक्ष अरविंद लवळे, माजी सरपंच सुरेश पाटील, मंडल अधिकारी, पोलीस पाटील सुरज दळवी, उपसरपंच विजय कदम आदिसह दोन्ही समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker