क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगराज्यसातारा

कराड- सातारा दरम्यान कंटेनरसह 47 लाखांचा विमल, रंजनीगंधा गुटखा सापडला

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला 47 लाख 1 हजार 920 रुपये किंमतीचा गुटखा विमल पान मसाला, रजनीगंधा पानमसाला (गुटखा) व 20 लाख रुपयांचा टाटा 1109 ट्रक कंटेनर असा एकूण 67 लाख 1 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पुणे- बेंगलोर महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत करण्यात आली. या प्रकणात गुफारान शमीम खान (वय- 36 वर्षे, रा- 144 आयशा बिल्डिंग, भोलेनाथ नगर, मुंब्रा ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम टाटा 1109 ट्रक कंटेनर मधून गुटखा पुणे येथे घेवून जाणार आहे. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने संशयित वाहन ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पथकाने शेंद्रे (ता. जि. सातारा) गावचे हद्दीत समराथल राजस्थानी हायवे होटलचे जवळ लावला. संबधित टाटा 1109 ट्रक कंटेनर आल्याने त्यास थांबवून त्यामधील चालकाकडे विचारपूस केली असता. त्याने कंटेनरमध्ये विमल रजनीगंधा गुटखा असल्याचे सांगितल्याने विमल पान मसाला व व्ही. -1 टोबॅको (तंबाखू), रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, तुलसी रॉयल जाफराणी जर्दा असा 47 लाख 1 हजार 920 रुपये किमतीचा प्रतिबंधीत गुटखा व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक कंटेनर असा एकूण 67,01,120 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सदर बाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वंदना रुपनवर, इम्रान हवालदार यांना कळविल्यानंतर त्यांनी समक्ष हजर होवून ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पंतग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, सचिन साळूंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, अमित माने, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे यांनी सदरची कारवाई केली केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker