kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्य

सरकारने नैतिकता पाळून पायउतार व्हावे : जयंत पाटील

मुंबई | शिंदे सरकार वाचलं हे थोडे दिवस त्यांना आनंद वाटेल पण भाजपने महाराष्ट्रात केलेली कृती चुकीची आहे.राज्यपालांच्या अधिकाराचा गैर वापर झाला. न्यायालयाने नाेंदविलेल्या निरीक्षणानूसार शिंदे सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी नैतिकता पाळून पायउतार व्हायला पाहिजे असेही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीतून जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जयंत पाटील यांना आज ईडीची नोटीस आली असून सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आजच सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यावर आता जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.

जयंत पाटील म्हणाले, कोर्टाने काही ताशेरे शिंदे- भाजप सरकारवर अोढले आहेत. राज्यपालांची भूमिका, प्रतोदाचा व्हिप यांनी केलेला पदाचा गैरवापर यामुळे सर्व चुकीचे झाले आहे. तेव्हा नेतिकता पाळून सरकारने पायउतार व्हावे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close