क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

कराड, मलकापूर व विद्यानगरला कॅफेवर छापे : काॅलेजच्या 30 युवक- युवतींना घेतले ताब्यात

कराड । कराडचे नव्याने रूजू झालेल्या डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी आज काॅलेजच्या युवक- युवतींना चांगलाच धडा शिकवला. सकाळ- सकाळी कराड शहरासह, मलकापूर व विद्यानगर परिसरातील कॅफेवर धाडी टाकल्या. या धाडीत तब्बल 15 युवती व 15 युवकांना ताब्यात घेण्यात आले. तसेच 4 कॅफे चालकांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन युवक- युवतींच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेश करण्यात आले. डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या कारवाईने कॅफे चालकांसह युवक- युवतीचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Kota Academy Karad

याबाबतची अधिक माहिती अशी, कराड शहर, मलकापूर शहर व विद्यानगर येथे अनेक कॅफे सुरू आहेत. यातील अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे काही गोष्टी घडत असल्याची माहिती डीवायएसपी अमोल ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार पीएसआय राजेंद्र पुजारी, वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील यांच्यासह १५ जणांच्या पथकाने सदरची कारवाई केली. या पथकाच्या कारवाईने कॅफेत अश्लिल चाळे सुरू असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे युवक- युवतींना पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.

शनिवारी (दि.10) सकाळी 11 वाजता डीवायएसपी याच्या दोन पथकांनी सदरची कारवाई केली. या कारवाईमुळे कॅफे चालकांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे पहायला मिळाले. तरूण पिढी भरकटू नये, यासाठी पोलिसांनी महाविद्यालयीन युवक- युवतींचे समुपदेशन केले. तर कॅफे चालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker