क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

साताऱ्यात पैलवानावर चाकू हल्ला : एक महिलेसह दोन युवक पोलिसांच्या ताब्यात

सातारा । सातारा शहर परिसरात गेल्या काही दिवसात किरकोळ कारणावरून चाकू व कोयता हल्ला करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. शहरातील राजवाडा परिसरातील राजधानी टॉवर येथे मुख्य रस्त्यावर जुन्या वादातून एकावर काही जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात गणेश शंकर पैलवान (रा. चिपळूणकर बाग, मंगळवार पेठ, सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते, मात्र, प्रकृती गंभीर बनल्याने नंतर गणेश पैलवान यांना उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. याप्रकरणी एका महिला व दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Kota Academy Karad

चिपळूणकर बाग गणेश शंकर पैलवान हे राहण्यास आहेत. छोटीमोठी कामे करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. दोन दिवसांपूर्वी त्यांची त्याच परिसरात राहणाऱ्या काही जणांशी वादावादी झाली होती. वादावादीनंतर झालेल्या मारामारीबाबत गणेश पैलवान यांनी याची अदखलपात्र तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात परिसरात नोंदवली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू होती. शुक्रवारी दुपारी गणेश पैलवान हे कामानिमित्त तांदूळ आळी येथे आले होते. याच ठिकाणहून परतत असताना राजधानी टॉवरसमोरील मुख्य रस्त्यावर त्यांना वाद झालेल्यांपैकी एक महिला व दोन युवक भेटले. याठिकाणी पुन्हा त्यांच्यात किरकोळ वाद झाला. वादानंतर त्याठिकाणी महिलेसोबत असणाऱ्यांनी गणेश पैलवान यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यावेळी धारदार शस्त्राने गणेश पैलवान यांच्या डोक्यात वार केला. हा वार जिव्हारी लागल्याने गणेश पैलवान हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.

जखमीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाच्या सूचना पोलिस निरीक्षक संजय पतंगे व कर्मचाऱ्यांना केल्या. याप्रकरणी पोलिसांनी एक महिला व दोन युवकांना ताब्यात घेतले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close