kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

महायुती 45 प्लस लोकसभा आणि विधासभा 225 प्लस जागा जिंकणार : शंभूराज देसाई

सातारा | काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत पवारांशिवाय लोकसभेची तयारी करावी लागेल. या झालेल्या चर्चा बाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मिश्किल टीपणी केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना विचारूनच शरद पवारांना लोकसभेसाठी घ्यायचं का? हा निर्णय घेण्याची गरज आहे. कारण उद्धव ठाकरे यांचा निर्णय संजय राऊत घेतात. यामुळे संजय राऊत यांना सोडूनच नाना पटोले उद्धव ठाकरे यांना भेटले असावेत. संजय राऊत हे शरद पवारांना सोडून हा निर्णय होऊ देणार नाहीत. त्यांनी दोघांनी एकत्र लढावं अन्यथा तिघांनी तरीही महायुती 45 हुन अधिक जागा लोकसभेच्या मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील. तर 2024 च्या निवडणुकीत 225 हून अधिक जागा जिंकणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

नाना पटोले यांनी फक्त वाट बघावी मंत्री शंभूराज देसाई
दोन उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर लक्ष असल्याचे विधान नाना पटोले यांनी केलं होतं. याला मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलय. आमची काळजी नाना पटोले यांनी करण्याची गरज नाही. आमचा संसार सुखाचा चालू आहे. याविषयी अजित पवारांनी सांगितले आहे. आम्ही वेडे नाही, ती खुर्ची भरलेली आहे. कोणाचाही कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही. नाना पटोले यांनी फक्त वाट बघावी. यातील कोणत्याही खुर्चीकडे बघायची संधी देखील त्यांना मिळणार नाही, असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.

शासन आपल्या दारी उपक्रमाला चांगला प्रतिसाद
राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण पार पडले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या दरम्यान पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी साताऱ्यातील जनतेला शुभ संदेश दिला. सातारा जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकताच या पर्यटनाचा आढावा सादर केला. याबरोबरच जिल्ह्यात शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात पाटण तालुक्यातील झाली असून याला चांगला प्रतिसाद जनतेतून मिळत असल्याची भावना यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close