Shekar Patil Maqheshwari Infra 1
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसातारासामाजिकसोलापूर

आषाढी एकादशी 2023 : माऊलीची पालखी 18 जूनला सातारा जिल्ह्यात

सातारा | आषाढ महिन्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही मानाच्या पालख्यांपैकी एक असते. आळंदी ते पंढरपूर असा या पालखीचा प्रवास असतो. तर यामध्ये विविध ठिकाणी मुक्काम, रिंगणा सोहळा, वारकरी, पंगती अशा थाटात माऊलींची पालखी पंढपूरात दाखल होत असते. यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायीवारीचे 11 जून रोजी आळंदीहून पंढरपुरकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली आहे. तर 18 जूनला सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे.

रविवार दि. 11 जून रोजी प्रथा-परंपरेनुसार सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास माऊलींच्या पालखीचे वाजत-गाजत प्रस्थान होणार आहे. दर्शनबारी मंडपामध्ये (आजोळी) माऊलींचा पहिला मुक्काम असणार आहे. दि. 12 व 13 जूनला पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी राहणार आहे. दि. 14 व 15 रोजी सासवड, दि. 16 रोजी जेजुरी, 17 वाल्हे, 18 जूनला नीरा स्नाननंतर 19 जूनपर्यंत पालखी लोणंद येथे मुक्कामी असेल. दि. 20 तरडगाव, दि. 21 ला फलटण, 22 बरड, 23 नातेपुते, 24 माळशिरस, 25 वेळापूर, 26 ला भंडीशेगाव, 27 वाखरी तर दि. 28 जून रोजी पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपुरला मुक्कामी पोहोचेल.

पंढरीमध्ये आषाढी एकादशीचा महासोहळा दि. 29 जून रोजी संपन्न होईल. दरम्यान, पालखी सोहळयात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व पादुकाजवळ उभे रिंगण तर पुरंदवडे, खुडूस फाटा, ठाकुरबुवाची समाधी आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंग होईल. दि. 3 जुलै पौर्णिमेपर्यंत पालखी सोहळा विठ्ठल नगरीत विसावेल. गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघेल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close