रामकृष्ण वेताळांचा अनोखा उपक्रम : दु:खातील 2400 जणांच्या घरी पोहचले दिवाळी फराळ


ओगलेवाडी :- लोकांच्या सुख दुःखामध्ये सामील होऊन जीवन जगणे म्हणजे काय असते? याचे अनोखे उदाहरण रामकृष्ण वेताळ यांनी घालून दिले आहे. कराड उत्तर मतदारसंघांमध्ये अकस्मित दुःखद घटना घडल्याने ज्यांच्या घरी दिवाळी साजरी होणार नव्हती. अशा 2400 कुटुंबियांना रामकृष्ण वेताळ यांनी दिवाळी फराळ घरपोच केला. यामुळे या दुःखी कुटुंबीयांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. माणुसकी आणि लोकांमधिल नेता याचे अनोखे उदाहरण या निमित्ताने कराड उत्तर मध्ये पाहायला मिळाले.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ हे जनमानसातील नेते म्हणून समाजामध्ये प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्यांना नेहमी मदतीचा हात देणारे अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मागील संपूर्ण वर्षभरामध्ये कराड उत्तर मतदारसंघातील ज्या कुटुंबियांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. दुःखद घटने मुळे त्यांच्या घरी दिवाळी साजरी केली जाणार नव्हती. अशा लोकांचे दुःख जाणून रामकृष्ण वेताळ यांनी दिवाळी फराळ भेट उपक्रम राबवला. अनेकजण समाजातील अधिकारी, पदाधिकारी, राजकीय नेते यांना दिवाळी भेट देतात. पण रामकृष्ण वेताळ यांनी दुःखितांच्या घरी दिवाळी पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाद्वारे सुमारे 2400 दिवाळी फराळाच्या किट त्यांनी दुःखीतांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचल्या.
अतिशय उत्तम दर्जाचा फराळ घेऊन आपला माणूस आपल्या दारी आला हे पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हासू आणि आसू अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. आपला माणूस म्हणजे काय असतो याचे उदाहरण त्यांनी आपल्या अनोख्या कार्यातून करून दिले आहे. एक उत्तम राजकारणी कसा असतो हे त्यांनी त्यांच्या उपक्रमातून दाखवून दिले आहे.
रामकृष्ण वेताळ हे सातत्याने लोकाभिमुख राजकारण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. वर्षभर विविध उपक्रम राबवून ते लोकहिताची कामे करत असतात. शासकीय योजना लोकापर्यंत पोहोचण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, क्रीडापटूंना मदत व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून देणे असेही विविध उपक्रम राबवत असतात. यावर्षी मात्र त्यांनी दुःखीतांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
भाऊ आमचा हक्काचा माणूस
दुःखाच्या प्रसंगी अनेक जण ओळख ठेवत नसतात. जवळची माणसे ही परकी होत असतात. अशा वेळेस दिवाळी भेट घेऊन दारी आलेला रामकृष्ण वेताळ हा आमचा हक्काचा माणूस आहे अशीच प्रतिक्रिया लोक देत होते. दिवाळी फराळ भेट स्वीकारताना काही जण निशब्द अश्रुतून आपल्या भावना व्यक्त करत होते. तर काहीजण आमचा हक्काचा माणूस अशाही भावना बोलून दाखवत होते.



