kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यसातारा

कराड- पाटण मार्गावर गांजासह दोन युवकांना अटक

कराड – वारुंजी (ता. कराड) गावचे हदीत कराड- पाटण रोड परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे अनुषंगाने विशेष मोहीम राबवुन साडे दहा किलो गांजा व एक मोटर सायकल असा एकूण 3,52,600/-रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या  प्रकरणात राहुल शिवाजी मोरे (वय- 21 वर्ष, रा. नारायणवाडी- कालेटेक, ता. कराड) आणि निखील शशीकांत थोरात (वय- 25 वर्ष, रा. नांदलापुर, ता. कराड) यांना ताब्यात घेतले आहे.

कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार कराड शहर डि. बी. प्रमुख गणेश कड व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयित दोघांना गाडीवरुन जात असाताना पाठलाग करुन ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डि. बी. पथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड, पो. हवा. शशि काळे, अशोक वाडकर अमित पवार, अनिल स्वामी, आनंदा जाधव, मोहसीन मोमीन, संदीप कुंभार, महेश शिंदे, हर्षद सुखदेव, धीरज कोरडे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ, सपना साळुंखे यांनी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close