KARAD – उद्या पुतण्याचे लग्न आणि आज चुलत्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू

कराड:- पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कोल्हापूर नाक्यावर भरधाव ट्रकने दुचाकी स्वाराला धडक दिली. यामुळे दुचाकी स्वार रस्त्यावर पडला व त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. कराड तालुक्यातील मुंढे गावातील अशोक शिवराम जमाले वय-70 असे अपघातात ठार झालेले चुलत्याचे नाव आहे.
अशोक जमाले यांच्या घरात उद्या पुतण्याचे लग्न असल्याने साहित्य खरेदी करण्यासाठी घरातील तरुणांसोबत अशोक जमाले कराडला आले होते. यावेळी लग्नासाठी उद्या पानसुपारी लागणार असल्याने दुचाकीवरून आणण्यासाठी निघालेल्या चुलत्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. यावेळी जागीच ठार झालेल्या चुलत्याला पाहून पुतण्याने अक्षरशा टाहो फोडला. घटनास्थळी पुतण्याचा तसेच घरातील तरुणांचा आक्रोश पाहायला मिळाला.
घटनेची माहिती मिळताच डीपी जैन कंपनीचे पीआरओ ऑफिसर दस्तगीर आगा, पैलवान अमृत बाबर, रामचंद्र सरगर, जगन्नाथ थोरात तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ॲम्बुलन्स व कराड शहर वाहतूक शाखेला कळवले यामुळे पोलीस कर्मचारी तसेच ॲम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाली दरम्यान या अपघातामुळे कोल्हापूर नाक्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर वाहतूक सुरळीत केली.