आरोग्यताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

सह्याद्रीत IVF सेवा :- वंध्यत्वाशी झुंज देणाऱ्या जोडप्यांसाठी नवी दिशा

कराडमधील सह्याद्रि हॉस्पिटलला IVF दिशा

कराड – वंध्यत्व हा आज जागतिक पातळीवर वाढता आरोग्यविषयक मुद्दा ठरत असून जगभरातील प्रत्येक सहा जोडप्यांपैकी एक जोडपे याचा सामना करत आहे. भारतात देखील पुरुष आणि स्त्रियांमधील वंध्यत्वाचे प्रमाण सातत्याने वाढत असून, ग्रामीण आणि उपनगरांमध्ये जागरूकतेचा अभाव, सामाजिक दबाव आणि तज्ज्ञ उपचारांची कमतरता यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनही जोडपी १० ते १२ वर्षांपर्यंत नैसर्गिक गर्भधारणा होण्याची वाट पाहत किंवा पर्यायी उपचारांवर अवलंबून राहतात, ज्यामुळे योग्य वैद्यकीय हस्तक्षेप उशिरा होतो आणि यशाचे प्रमाण घटते.

या पार्श्वभूमीवर सह्याद्रि हॉस्पिटल्स, कराड हे सातारा, कोकण आणि आसपासच्या भागातील वंध्यत्व उपचारांसाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून पुढे आले आहे.ही IVFसुविधा रुग्णालयात मागील ७–८ वर्षांपासून सतत उपलब्ध आहे आणि या काळात जटिल वंध्यत्व प्रकरणांवर सातत्याने उपचार झाले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत येथे जवळपास ५०० अवघड वंध्यत्व प्रकरणे हाताळली गेली आहेत. यात अनेक वेळा IVF/IUIअपयश, कमी अंडाशय कार्यक्षमता, पुरुष वंध्यत्व, वाढते वय आणि इतर उच्च जोखमीची प्रकरणे यांचा समावेश होता.

रुग्णालयात IVF, ICSI, IUI, PGTटेस्टिंग, फर्टिलिटी प्रिझर्व्हेशन, PCOSमॅनेजमेंट, पुरुष वंध्यत्व उपचार यांसह सर्वसमावेशक फर्टिलिटी सेवा उपलब्ध आहेत. अत्याधुनिक तपासणी आणि एम्ब्रायोलॉजी सुविधा असलेल्या रुग्णालयात पारदर्शक व परवडणारी IVFपॅकेजेस आणि सोयीस्कर पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होत आहे.

सह्याद्रि हॉस्पिटल्स, कराड येथे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतून रुग्ण उपचारासाठी येतात. ग्रामीण भागातील अनेक महिला साधारण १५–२० वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर, प्रामुख्याने ३५ ते ४७ वर्षांच्या वयोगटात उपचारासाठी पुढे येतात. तसेच सध्याच्या काळात २५–३५ वर्षे वयोगटातील तरुण जोडप्यांमध्येही उपचारांविषयी जागरूकता आणि आरोग्याबाबतची गंभीरता वाढताना दिसते. महिलांमध्ये अनियमित पाळी, हार्मोन्सचे असंतुलन आणि समस्या तर पुरुषांमध्ये तंबाखूचे सेवन, कमी शुक्राणू संख्या आणि शेतीत खत-रसायनांच्या संपर्कामुळे शुक्राणूंची गुणवत्ता घटणे या समस्या वारंवार आढळतात.या अडचणी असतानाही सह्याद्रि हॉस्पिटल्स, कराड येथे नियमितपणे चांगले परिणाम दिसत आहेत. दर महिन्याला साधारण १०–१५ जोडपी येथे उपचारासाठी येतात, आणि अनेकांना दीर्घकालीन प्रयत्नांनंतर गर्भधारणा झाली आहे.

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ व IVFस्पेशालिस्ट डॉ. वृशाली चव्हाण म्हणाल्या, “जेव्हा रुग्ण आमच्याकडे IVFउपचारासाठी येतात, तेव्हा आम्ही त्यांना स्पष्ट मार्गदर्शन, अचूक तपासणी आणि वैयक्तिकृत उपचार प्रदान करतो, जे IVFप्रक्रियेत चांगले परिणाम मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आमच्या IVFविभागाच्या सेवा आम्ही अनेक वर्षांपासून सातत्याने देत आहोत, आणि आमचे उद्दिष्ट हे आहे की रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये न जाता स्थानिक पातळीवरच उच्च-गुणवत्तेची फर्टिलिटी सेवा मिळावी. वैज्ञानिक पद्धती, पारदर्शक सल्लामसलत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, आम्ही प्रत्येक जोडप्याला सुरक्षित, वैयक्तिकृत आणि प्रभावी उपचार देण्याचा प्रयत्न करतो.अलीकडेच ४१ वर्षांची एक महिला औरंगाबादसारख्या शहरामध्ये अनेक IVFअपयशानंतर आमच्याकडे आली होती. आम्ही तिच्या एंडोमेट्रियमचा दोन-तीन महिने अभ्यास केला, त्यात सुधारणा केली आणि योग्य वेळी एम्ब्रियो ट्रान्सफर केला. ती पहिल्याच प्रयत्नात गर्भवती झाली, आणि तिची गर्भावस्था उत्तम सुरू आहे. अशा प्रकरणांमुळे हे स्पष्ट होते की, योग्य वेळ, नियोजन आणि अचूक तपासणी केल्यास, अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश मिळवता येऊ शकते.”

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराडचे युनिट हेड डॉ. अमित माने म्हणाले,“ग्रामीण भागात वंध्यत्व एक आरोग्यविषयक आव्हान असताना, महिलांना अनेक वेळा मानसिक आणि सामाजिक दबावांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आमचे लक्ष नेहमीच घराजवळ उपलब्ध, विश्वासार्ह आणि संवेदनशील IVFसेवांवर आहे, ज्याचा लाभ सातारा आणि कोकणातील अनेक कुटुंबांनी घेतला आहे.”

सह्याद्रि हॉस्पिटल्स, कराड ग्रामीण आणि उपनगरांतील जोडप्यांना गेल्या अनेक वर्षांपासून आधुनिक, परवडणारे आणि सर्वसमावेशक वंध्यत्व उपचार उपलब्ध करून देत आहे आणि अनेक कुटुंबांच्या पालकत्वाच्या स्वप्नाला नवी दिशा देत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close