ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावरती पैसे ठेवा :- चेअरमन शरद चव्हाण

अशोकराज नागरी पतसंस्थेच्या सन 2026 ची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

कराड :- “पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावरती पैसे ठेवा” या ब्रीदवाक्यानुसार अशोकराज पंतसंस्थेची वाटचाल सुरू आहे. सभासदांच्या विश्वासामुळे आज अखेर संस्थेच्या ठेवी 18 कोटी रुपये तर कर्जवाटप 14 कोटी रुपये इतके झाले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन शरद चव्हाण यांनी दिली.

अशोकराज नागरी पतसंस्थेच्या वतीने सन 2026 ची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी संचालक नवनाथ पालेकर, निवासराव शिंदे, तुकाराम डुबल, राजकुमार चव्हाण, संस्थेचे ऑडिटर संपतराव शिंदे, ॲड. विश्वासराव निकम तसेच बी. के. पाटील आदींनी आपली भाषणे करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

संस्थेमार्फत सभासदांना आकर्षक व्याजदराने बचत व मुदत ठेव योजना, अल्प व दीर्घ मुदतीचे कर्ज, महिला व युवकांसाठी विशेष कर्ज योजना तसेच जलद व सुलभ कर्ज प्रक्रिया उपलब्ध करून दिली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे व्हाईस चेअरमन शिवाजी यादव यांनी उपस्थित मान्यवर, सर्व संचालक मंडळ, सभासद व कर्मचारीवर्गाचे आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे औपचारिक प्रकाशन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close