
मुंबई :- ऑक्टोबर 2024 रोजी सिडकोने ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतील विजेत्या सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी टाईम लाईन निश्चित करा व चांगल्या दर्जाची घरे द्या असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सिडको प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
विधानभवन येथील विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात आज ऑक्टोबर 2024 रोजी सिडकोने ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतील घरांच्या अवाजवी किंमती कमी करण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिडको महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच मानसरोवर, कळंबोली, पनवेल, खांदेश्वर, बामनडोंगरी, तळोजा व खारकोपर येथील सिडको सोडतीचे विजेते उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, सिडकोमार्फत ऑक्टोबर-२०२४ मधील घरांच्या अवाजवी किंमती कमी करण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच विजेत्यांना घरकुलाचा ताबा वेळेत लवकर देण्यासाठी चौकटीत राहून रेराच्या अटी शर्थीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात यावा.
सिडकोने सामान्य नागरिकांचे हित लक्षात घेत सिडकोच्या प्रक्रियेतून बाद झालेल्या विजेत्यांना घरे मिळण्यासाठी पुन्हा संधी द्यावी. तसेच ज्या ठिकाणी इमारती पूर्ण झाल्या असतील अशा ठिकाणी विजेत्यांना प्राधान्य देण्यात यावे अश्या सूचना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या आहेत.