ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

शरद पवारांची निशाणी अंगठा तर संजय राऊतांची निशाणी…? : आ. शिंदेची जीभ घसरली

सातारा | महाविकास आघाडीची वज्र मुठ नसून ती वज्र मुत आहे. अंगठा हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निशाणी आहे. तर संजय राऊत यांची निशाणी करंगळी आहे. त्यामुळे शरद पवार कधी ठेंगा दाखवतील हे कळणार ही नाही, असे म्हणत महाविकास आघाडी व त्याच्या नेत्यांवर टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे हे नेहमीच महाविकास आघाडीवर हल्लोबोल करत असतात. आजही त्यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी महाविकास आघाडीतील नेते व त्याचे स्थान कोणत्या बोटावर आहे, तसेच त्यांचा काय उपयोग म्हणून केला जातो हे स्पष्ट करताना महाविकास आघाडीवर बोलताना त्याची घसरली.

आमदार महेश शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीची वज्र मुठ नसून ती वज्र मुत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निशाणी अंगठा आहे. कधी आत तर कधी बाहेर. त्यांनी कोणाला ठेंगा दाखवलेला ही कळणार नाही. तर करंगळी हे संजय राऊत यांची निशाणी आहे. थंडीमध्ये आपण त्या बोटाचे indication चे वर्णन करतो, ते संजय राऊताचे चिन्ह आहे. तिसरे बोट नाना पटवले. तर चौथे बोट अजित पवार आणि सर्वात मधले बोट हे माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत. अजित पवार आणि नाना पटोले या दोघांच्या मध्ये उद्धव साहेबांना दाबून- दाबून काय अवस्था झाली असेल ते पहा. त्यामुळे ही वजन मोठ नसून ती वजर होत आहे, असा खोचक टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी लगावला आहे..

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close