श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या चेअरमनपदी धनश्री साळुंखे तर व्हाईस चेअरमन पदी सुलोचना पिसाळ बिनविरोध

पुसेसावळी । खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी धनश्री साळुंखे यांची तर व्हाईस चेअरमन पदी सुलोचना पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाचे तसेच चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे वर्धन कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम, माण-खटाव कारखान्याचे व्हा. चेअरमन मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे नेते विक्रमशील कदम यांनी अभिनंदन केले.
श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात नवनिर्वाचित संचालक म्हणून उमेश पिसाळ, नंदकुमार पिसाळ, मारुती पिसाळ, कृष्णत लोकरे, दत्तात्रय घोडके, अशोक शिंगाडे, हणमंत मदने, दादा अवघडे यांची निवड करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे सचिव जोतीराम पिसाळ, कॅशियर अर्चना पोतदार उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल माळी म्हणून यांनी काम पाहिले.
या निवडीनंतर गोविंद पिसाळ, मातृभूमी प्रोडूसर कंपनीचे चेअरमन श्रीकांत पिसाळ, बापूशेठ पिसाळ, माजी चेअरमन सतीश पिसाळ, माजी सरपंच किसन घुटुगडे, माजी चेअरमन हनमंत पिसाळ, सचिन पिसाळ, विलास पिसाळ, नवनाथ पिसाळ, मच्छिंद्र पिसाळ, प्रशांत पिसाळ, किरण पिसाळ, चंद्रकांत अवघडे, वामन अवघडे, विलास पवार, शांताराम पिसाळ, अशोक पाटील, आण्णासो पिसाळ, वसंत पिसाळ, माजी. चेअरमन विजय पिसाळ, सुनील पिसाळ, रवींद्र पिसाळ, प्रशांत पिसाळ, सदाशिव साळुंखे,बुवासो पिसाळ, पांडुरंग पिसाळ, संजय चव्हाण, बापूराव पिसाळ,अशोक मदने, संभाजी कुंभार, अभिजीत पिसाळ, सुनील पिसाळ, जयवंत पिसाळ, शरद पिसाळ, संजय पिसाळ, शिवाजी पिसाळ, रामदास पिसाळ,विठ्ठल पिसाळ, अनमोल गुरव, आण्णासो साळुंखे,आदींसह ग्रामस्थ व सभासदांनी अभिनंदन केले.