क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

घरगुती वादातून झालेल्या मारहाणीत वडिलाचा मृत्यू

कोपर्डे हवेली येथील घटना

कराड / कोपर्डे हवेली येथे मुलाने मद्य प्राशन करुन घरगुती वादातुन रागाच्या भरात वडीलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्या मारहाणीत वडीलांचा मृत्यु झाला असल्याचे समोर आल्याची माहिती तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आज दिली. दरम्यान, संबंधित मारहाणीत वापरण्यात आलेले दांडके पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांची माहिती अशी, कोपर्डे हवेली येथील तानाजी लक्ष्मण होवाळ (वय 65, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड) यांना दारुचे व्यसन होते. सोमवारी (ता. 17) रात्री दहाच्या सुमारास अभिजीत उर्फ पप्प्या होवाळ याचा आणि कुटुंबीयांचा वाद झाला. त्यात त्याने वडील तानाजी होवाळ यांना दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यु झाला.

दरम्यान, या प्रकऱणी अभिजीत उर्फ पप्या होवाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पोलिस कोठडीही मिळाली आहे. आज त्याच्याकडे पोलिसांनी तपास केली. त्यामध्ये त्याने घरगुती वादातुन रागाच्या भरात वडीलांना लाकडी दांडक्याने मारले. त्यामध्ये त्यांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत संबंधित संशयीताने वापरलेले लाकडी दांडके पोलिसांनी जप्त केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक खोबरे करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker