Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

ग्रामसेवकांकडून लाच : वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी रंगेहाथ सापडला

सातारा | खटाव तालुक्यातील वडूज येथील पंचायत समितीचा विस्तार अधिकाऱ्यास 12 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार ग्रामसेवकास याच्याकडे कारणे दाखवा नोटीसीच्या अनुषंगाने कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. संजय विलासराव सोनावले (वय- 56, रा. सातारा, मूळ रा. पाली, ता. कराड) असे विस्तार अधिकाऱ्यांचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार ग्रामसेवक असून लोकसेवक संजय विलासराव सोनावले, विस्तार अधिकारी (पंचायत) वडूज हे तक्रारदार यांना कार्यालयीन कामकाजामध्ये शुल्लक चुका काढून तक्रारदार यांचा मानसिक छळ करीत असत. तसेच तक्रारदार यांचा वरिष्ठांना कसूरी अहवाल पाठवेन, तक्रारदार यांना निलंबित करेन अशा धमक्या देत असत. अशाच एका प्रकरणामध्ये तक्रारदार यांना लोकसेवक यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती. सदरच्या कारणे दाखवा नोटीसीच्या अनुषंगाने तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक संजय सोनावले यांनी तक्रारदार यांचेकडे आज (दि. 25) पडताळणी दरम्यान 12 हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक पुणे अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चाैधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सातारा उज्वल वैद्य, पो. ना. प्रशांत नलवडे, पो. काॅ. तुषार भोसले, पो. ना. निलेश चव्हाण, चा. पो. ना. मारूती अडागळे यांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close