क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

महिलेवर कोयत्याने हल्ला करणारा पोलिसांना सापडला

वहागावमधून कराड पोलिसांनी घेतले ताब्यात

कराड :- महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्यास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने वहागाव येथून शुक्रवारी पहाटे अटक केली. रविंद्र सुभाष पवार (वय ३५, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. कोयता हल्ल्यात गंभीर जखमी पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर- आगाशिवनगर येथील एका महिलेवर रवींद्र पवार याने स्वतःसोबत आणलेल्या कोयत्याने वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. हल्लेखोर रवींद्र पवार याने तेथून पळ काढला. नागरिकांनी जखमी महिलेला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत आगाशिवनगर डोंगर परिसरात त्याचा शोध घेतला जात होता. तसेच श्वान पथकामार्फतही त्याचा माग काढण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी पहाटे रवींद्र पवार हा वहागावच्या हद्दीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केले. हल्ल्यापाठीमागील नेमके कारण तपासातून समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker