ताज्या बातम्यानोकरी संदर्भपश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यशैक्षणिकसातारा

महाराष्ट्रातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र कराडमध्ये उभारणार : परवेझ दमानिया

कराड विमानतळावर नाईट लॅण्डींग यशस्वी

कराड | पश्चिम महाराष्ट्रात कराड विमानतळ हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने कराड येथे वैमानिकांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याअंतर्गत येथील विमानतळावर नाईट लॅण्डींगही करण्यात आले असुन ते यशस्वी झाले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल, अशी माहिती अँबिशिएन्स एव्हीएशन फ्लाईंग क्लबच्यावतीने संचालक परवेझ दमानिया यांनी आज दिली.

श्री. दमानिया म्हणाले, येथील विमानतळ हे जास्त एअर ट्राफीक नसलेले विमानतळ आहे. त्यामुळे या विमानतळाचा वापर वैमानिक प्रशिक्षण सेंटरसाठी सुरु करता येईल असा मानस होता. त्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार येथील विमानतळावर हे प्रशिक्षण केंद्र सुरु झाले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीशी तीन वर्षाचा करार केला आहे. प्रशिक्षणासाठीची पाच विमाने या ठिकाणी आणण्यात आली आहेत. अजुनही मोठ्या क्षमतेची विमाने आणण्यात येतील. यातील दोन विमाने दोन सीटची तर एक विमान चार सीटचे आहे. या विमानांसाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगर केला आहे.

कराड विमानतळावर नाईट लॅण्डींगही करण्यात आले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल. स्थानिकांसह देशभरातील सुमारे 25 विद्यार्थ्यांना सध्या येथे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांचा कालावधी दोन वर्षांचा आहे. प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनण्यासाठी 200 तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता प्रत्यक्षपणे प्रशिक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली असल्यामुळे याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास श्री. दमानिया यांनी व्यक्त केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker