Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराजकियराज्यसातारा

खा. गिरीश बापट यांच्या निधनामुळे आ. शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द

सातारा | सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस गुरुवार (दि. ३०) रोजी असून भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री, खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे बुधवार दि. २९ व दि. ३० रोजीचे वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केले आहे. वाढदिवस एकदम साधेपणाने साजरा केला जाणार असून गुरुवार दि. ३० रोजी सायंकाळी ६ वाजता शुभेच्छा स्विकारण्याचा कार्यक्रम होणार आहे. कोणीही पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू देऊ नये, केक कापणे, फटाके वाजवू नये अथवा इतर अन्य कार्यक्रम घेऊ नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

तसेच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिवंगत बापट साहेब यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दि. ३० मार्च रोजी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा वाढदिवस साजरा केला जातो आणि त्यानिमित्त गेल्या दोन- तीन दिवसांपासून सातारा- जावली मतदारसंघात विविध कार्यक्रम चालू होते. दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री, विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याचे वृत्त नुकतेच आले. हे वृत्त समजताच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करीत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

गुरुवार दि. ३० रोजी वाढदिवसानिमित्त एहसास मतिमंद मुलांची शाळा, रिमांड होम येथे भेट दिली जाणार आहे. तसेच गोडोली येथे रक्तदान शिबीर होणार आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आ. शिवेंद्रसिंहराजे कला वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर शुभेच्छा स्विकारणार आहेत. त्यावेळीही कोणीही पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू आणू नये, केक कापू नये, फटाके वाजवू नये, केवळ शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्ते, हितचिंतक आणि जनतेला केले आहे. वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला जाणार असून जनता, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी केवळ शुभेच्छा द्याव्यात, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close