कॅबिनेट मंत्र्याच्या हस्ते युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुरज शेवाळे यांचा सत्कार

कराड | भारतीय जनता पक्षाच्या कराड तालुका युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी सुरज शेवाळे यांची वर्णी लागली आहे. सुरज शेवाळे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते निवडीचे पत्र देत सत्कार करण्यात आला. त्याच्या निवडीबद्दल मलकापूरसह तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
वाठार (ता. कराड) येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माण- खटावचे आ. जयकुमार गोरे, कृष्णा कारखान्याचे चेअमरमन डाॅ. सुरेश भोसले, कराड उत्तर विधानसभा प्रमुख मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, माजी आ. आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, एकनाथ बागडी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थइत होते.
सुरज शेवाळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य तर लोकप्रिय नेतृत्व डाॅ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वात सातारा जिल्ह्यात आणि कराड तालुक्यातील विकासकामांचा रथ सुरू आहे. कराड तालुक्यातील युवकांची बांधणी करत युवकांना भाजपात संधी देण्याचा आपला मनोदय आहे.