कोतवाल आरक्षण सोडत : पाटणला 4 गावात महिला कोतवाल तर 3 गावाचे आरक्षण रिक्त

पाटण प्रतिनिधी। निवास सुतार
पाटण तालुक्यातील 16 सजातील “कोतवाल” संवर्गातील रिक्त पदासाठी आरक्षण सोडत करण्यात आली. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवड समितीच्या उपस्थितीत महसूल भवन येथे पार पडला. शासनाच्या नियमानुसार 80 टक्के सजातील आरक्षण जाहीर करण्याचे असल्याने 16 सजातील कोतवाल भरती होणार होती. त्यापैकी 13 गावाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून चार ठिकाणी आता कोतवाल पद हे महिलासाठी राखीव असणार आहे. तर चोपडी, सोनावडे आणि धामणी गावे वगळण्यात आली आहेत.
पाटणचे प्रातांधिकारी सुनिल गाढे, तहसीलदार रमेश पाटील, नायब तहसीलदार तुषार बोरकर, सहाय्यक आयुक्त सामाज कल्याण विभागाच्या प्रतिनिधी मानसी देशमुख, मंडलधिकारी, तलाठी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थित आरक्षण सोडत झाली. यावेळी श्लोक सुरज जाधव या अंगणवाडीच्या विद्यार्थ्याचे हस्ते चिठ्ठाने आरक्षण सोडत झाली.
एकूण 16 सजामधील कोतवाल पदासाठी आरक्षण पुढीलप्रमाणे-
(१) सळवे – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS)महिला, (२) वजरोशी- वि.जा.अ (महिला), (३) नाडे- सर्वसाधारण (महिला), (४) गोकुळ तर्फे हेळवाक- अनुसूचीत जमाती, (५) केरळ- अनुसुचित जमाती, (६) चाफळ- अनुसुचित जमाती (महिला), (७) येरफळे- अनुसुचित जमाती, (८) मोरगिरी-सर्वसाधारण, (९) डेरवण – भ.ज.ब, (१०) कातवडी- सर्वसाधारण, (११) भोसगाव- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS, (१२) बहुले- भ.ज.ड, (१३) घाणव – वि.मा.प्र, (१४) चोपडी- वगळले, (१५) सोनवडे- वगळले, (१६) धामणी- वगळले.