कराड तालुक्यात ”या” गावात 22 वर्षीय युवा शेतकऱ्यांचा शाॅक लागून मृत्यू
पावसाळ्यात विजेच्या धक्क्याने जिल्ह्यात घेतले 13 बळी

कराड (हॅलो न्यूज):- शेतात वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा विद्युत नियत्रंण पेटीचा वीजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यु झाला. विंग ( ता. कराड ) येथील कणसेमळा परिसरात ही घटना आज सकाळी घडली. वैभव कृष्णत नलवडे वय ( २२ ) असे संबधीत युवकाचे नाव आहे. जीवला चटका लावणाऱ्या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद तालुका पोलीसात झाली आहे.
घटनास्थळ अणि ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती असी मृत वैभव सकाळी शेतात वीजपंप सुरू करण्यासाठी गेला होता. वीज पंपावरील वीज नियंत्रण पेटीला स्पर्श करताच वीजेचा जोरचा धक्का त्याला बसला. तो जागीच कोसळला. शेतात काम करणाऱ्या महिलेच्या प्रकार पाहिला. तिनेच घरच्याना त्याबाबत माहिती दिली. वडील व अन्य शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी वैभवला कराडला खाजगी रूग्णालयात तातडीने हालवले. मात्र तत्पुर्वीच मृत्यु झाल्याचे डॅाक्टरी सुत्रानी सांगितले. कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात उतरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह घरी आणताच नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
कुटूंबातल्या एकुलत्या एक मुलांच्या दुर्दैवी मृत्युने कुटूंबीयाचा अक्रोश ह्रदय पिळवटणारा होता. सांयकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आई-वडील तीन बहिणी असा परिवार त्याचा आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटूंबतला वैभवने बारवी शिक्षण घेऊन तो घरच्यांना मदतीचा हातभार लावत होता. शेतीकामात तरबेज होता. वेळप्रसंगी इलेक्ट्रीक स्नेही म्हणून काम तो पाहत होता.अतिशय मनमिळाऊ, सुस्वभावी म्हणून मित्रपरिवारात तो परिचीत होता. त्याचा दुर्देवी मृत्यु अनेकांच्या जीवला चटका लावणारा ठरला.
सातारा जिल्ह्यातील विजेच्या दुर्दैवी घटना
१) 8 जुलै 2026 फलटण मधील खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
२) जून महिन्यात घोगाव येथे डीपीवर चढलेल्या एकाचा विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
३) जून महिन्यात नातू-आजीचा विजेच्या तारेच्या स्पर्शाने मृत्यू : माण तालुक्यातील मार्डी गावातील काळेवस्ती परिसरात शेळीचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या नातवाला आणि नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
४) एप्रिल महिन्यात कराड तालुक्यातील भोळेवाडीत अवकाळी पावसातील विजेच्या कडकडाटात शेतकरी दाम्पत्यावर वीज कोसळून सतीश सूर्यवंशी हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी उषा सुर्यवंशी या गंभीरपणे जखमी झाल्या.
५) माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील भारतीय सैन्यदलातील जवान प्रशांत कदम हे एप्रिल महिन्यात घरात विद्युत मोटारीचे काम करत असताना त्यांना विजेचा तीव्र शॉक लागला व त्यात त्यांचा मृत्यू झाला.
६) वाई तालुक्यातील आसले गावच्या शिवारात मार्च २०२६ रोजी विजेचा तीव्र धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे.
७) मे २०२६ मध्ये पाणवन (ता. माण) येथे शेतातील विहिरीत मोटर सोडताना विजेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
८) किरपे, ता. कराड येथील शेतकऱ्याचा शेतात विद्युत मोटार सुरू करण्यास गेले असता मोटारीचा विद्युत प्रवाहाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना जुलै २०२६ मध्ये घडली.
९) ४ ऑगस्ट कराड तालुक्यातील विंग येथे एका युवा शेतकऱ्यांचा शेतात मोटार सुरू करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू



