क्राइमताज्या बातम्याब्रेकिंगराजकियराज्य

कोर्टाचा निकाल : राहूल गांधींना 2 वर्षाची शिक्षा

हॅलो न्यूज | काॅंग्रेसचे नेते व खासदार राहूल गांधी यांनी मोदी आडनावरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल सुरत कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली. सुरतच्या जिल्हा कोर्टाने हा निकाल दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. परंतु कोर्टाने जामीनही मंजूर केला आहे.

सन 2019 साली कर्नाटक राज्यातील एका सभेत राहूल गांधी यांनी एक टिप्पणी केली होती. त्या टिप्पणीबद्दल सुरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहूल गांधी यांनी सभेत, नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना सगळ्या चोरांची मोदी आडनाव का असतात,असे म्हटले होते. या वक्तव्या प्रकरणी राहूल गांधींना कोर्टाने दोषी धरले आहे.

गुजरात राज्यातील सुरत कोर्टाने हा निकाल देत दोषी धरले असले तरी जामीनही मंजूर केला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close