Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासोलापूर

पालखी मार्गावर एसटी- कारच्या अपघातात 1 ठार तर विद्यार्थ्यांसह 9 जखमी

फलटण | पिंप्रदजवळ (ता. फलटण) येथे एसटी व कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाले. आळंदी- पंढरपूर पालखी मार्गावरील अपघातात कमल भीमराव यलपले (वय- ७०) असे ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. जखमीत एसटीतील पाच विद्यार्थ्यांसह महिला वाहकाचा समावेश आहे.

Shree Furniture karad

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गुणवरेहून फलटणच्या दिशेने निघालेली एसटी (एमएच- 14 बीटी- 1267) आणि फलटणहून सांगोलाच्या दिशेने चाललेली कार (एमएच- 12 डीवाय- 1502) यांची पिंपरद हद्दीतील बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्ती केंद्राजवळ समोरासमोर धडक झाली.

अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे ः- फलटणहून सांगोलाच्या दिशेने निघालेल्या कारचा चालक मोहन भीमराव यलपल्ले, पुतण्या सोयम यलपले, मुलगा वरद यलपले (सर्व रा. यल्लमड मंगेवाडी, ता. सांगोला) हे कारमधील जखमी झाले. तर एसटीमधील स्वाती बंडू खोमणे (वय- 17, रा. निंबळक), दयानंद सीताराम गावडे (वय- 19, रा. गुणवरे), श्रध्दा सूर्यकात दळवी (वय- 17), आकांशा बापू चव्हाण (वय- 17, दोघी रा. शेरे शिंदेवाडी), पूजा बिपिन निंबाळकर (वय- 17, रा. निंबळक) व महिला वाहक आश्विनी जयराम गोसावी अशी जखमींची नावे आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close