Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Corona अपडेट : सातारा जिल्ह्यात 32 पाॅझिटीव्ह

सातारा | गेल्या 8 दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्येत सातारा जिल्ह्यात झपाट्याने वाढ होवू लागली आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 32 रूग्ण पाॅझिटीव्ह आले आहेत. चालू वर्षात सर्वाधिक कोरोना रूग्ण संख्या एकाच दिवसात आढळून आली आहे. त्यामुळे सध्या कोरोनाचे 82 रूग्ण जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

सातारा जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी एकाच दिवशी 22 कोरोना रूग्ण आढळून आले होते. तर 2 रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी मास्कसक्ती केल्याचा आदेश काढला आहे. परंतु यांची अमंलबजावणी अद्याप होताना दिसत नाही. तसेच दिवसेंन दिवस कोरोना रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 293 रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 32 रूग्ण बाधित आढळून आलेत. तर 9 बाधितांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या पाॅझिटीव्ह रेट हा 10.92 टक्के इतका आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close