Hello News 2026 Ganpati Arati Book
कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

रूस्तम- ए- हिंदकेसरी सर्जाने नरवणेचे बैलगाडी मैदान जिंकले

सातारा | नरवणे (ता. माण) येथे सटवाईदेवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत जावेद मुल्ला तांबवे यांच्या सर्जा व माणिक या बैलजोडीने पहिल्या क्रमाकांचे अर्ध्या लाखांचे बक्षीस पटकावले. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने या मैदानावर बैलगाडा मालक व बैलगाडी शाैकिनांनी आनंदोत्सव साजरा केला.

या बैलगाडी शर्यतीतील बक्षिस विजेत्या बैलगाडी पुढीलप्रमाणे ः-
प्रथम क्रमांक ः- जावेद मुल्ला (तांबवे) सर्जा आणि माणिक बैलजोडी (५१ हजार), दुसरा क्रमांक ः- आरोही पकंज घाडगे (शिरसवाडी) रायफल आणि महाकाल बैलजोडी (३१ हजार), तिसरा क्रमांक ः- भोजलिंग प्रसन्न (वीरकरवाडी) मेहबुब आणि वर्या बैलजोडी (२१ हजार), चतुर्थ क्रमांक ः- दत्ता पाटील (झरे) भावड्या आणि सरदार बैलजोडी(११ हजार), पाचवा क्रमांक ः- ज्योतिर्लिंग प्रसन्न (नरवणे- कडेपूर) चिमण्या आणि सर्जा बैलजोडी (७ हजार), सहावा क्रमांक ः- वैभव आप्पासाहेब (माळशिरस) यांचा सुलतान आणि सागर बैलजोडी, सातवा क्रमांक ः- समर्थ डुबल (शिरवडे) सागर आणि बादल या बैलजोडीने फायनल मारली. बैलगाडी मैदानावर समालोचक सुनील मोरे (पेडगाव), प्रताप तात्या, झेंडा पंचा आनंदा जगदाळे यांनी काम पाहिले.

तांबवेकरांचा सर्जाला पाहण्यासाठी मैदानावर गर्दी
रूस्तम- ए- हिंदकेसरी व तांबवेकरांचा पब्लिकचा लाडका असलेल्या सर्जा बैलाने नरवणे मैदानात पहिल्या क्रमाकांचे 51 हजारांचे बक्षीस व ढाल मिळवले. सर्जा बैलाला पाहण्यासाठी आयोजित बैलगाडा मैदानावर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. हिंदकेसरी किताबाचा मानकरी सर्जा बैलाने पहिला राऊंड तसेच सेमीफायनल मैदान मोठ्या फरकाने मारले. त्यामुळे फायनल सर्जा बैल बाजी मारणार असल्याचे प्रेक्षक सांगत होते, अन् तसाच निकाल लागल्याने गुलालाची उधळण करित जावेद मुल्ला यांनी जल्लोष साजरा केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close