Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

साताऱ्याजवळ फर्निचरच्या दुकानाला भीषण आग : कोट्यावधीचे नुकसान

सातारा | शहरातून पुणे- बंगलोर महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गावरील रामनगर (वर्ये) परिसरात आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास एका फर्नीचरच्या गाेदामास भीषण आग लागली. प्लायवूड दुकानाला लागल्याने आगीने राैद्ररूप धारण केले होते. आग विझविण्यासाठी सातारा व भुईंज साखर कारखान्याचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीत कोट्यावधीचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रामनगर (वर्ये) येथील अंबिका फर्निचर याच्या गोडाऊनला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. शामुलचंद अोसवाल आणि रूपाशेठ यांच्या दुकांनाना आग लागल्याचे समजताच परिसरातील युवकांनी गाेडाऊनच्या दिशेने धाव घेतली. काहींनी फायर ब्रिगेडला, पाेलिसांनी फाेन केले. घटनास्थळी जमलेल्या युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीने राैद्र रुप धारण केले हाेते.

सातारा पालिकेचे फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी पाेहचले, ताेपर्यंत आगीची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली हाेती. आगीचा भडक्यामुळे गाेडाऊनच्या आत काेणाला जाता येत नव्हते. फायर ब्रिगेडच्या दाेन ते तीन गाड्या मागविण्यात आले. या पथकाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. घटनास्थळी सातारा तालुका पोलिसही दाखल झाले होते. परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close