10- 12 वी पास नोकरी : वनविभागात 2 हजार 138 पदासाठी भरती होणार

हॅलो न्यूज । महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात 2 हजार 138 वनरक्षक (गट- क) रिक्त पदे भरतीची (Forest Department- Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 10 जून 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्यात असणार आहे. अर्ज करण्यासाठी http://mahaforest.gov.in/ सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1000/- रूपये, मागास प्रवर्गासाठी 900/- रूपये फि असणार आहे. या पदासाठी 29 हजार 200 ते 92 हजार 300/- रूपये वेतन दरमहा असणार आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे अशी असेल.
पात्रता- http://mahaforest.gov.in/
1) या नोकरीसाठी अर्जदाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
2)अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10वी) उत्तीर्ण केली असणे गरजेचे आहे.
3) माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
4)नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचा-यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (100 वी) उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
5) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
या नोकरीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा असून पात्र ठरलेल्या उमेदवारांची 200 गुणांची स्पर्धात्मक परिक्षा ऑनलाईन पध्दतीने होईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये मराठी- 50, इंग्रजी- 50, सामान्य ज्ञान- 50 आणि बौधिक चाचणी- 50 हे चार विषय असतील.
(टिप- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)