Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Video : घारेवाडीत संत घाडगेनाथ दिंडी सोहळ्यात मेंढराचे गोल रिंगण

Brilliant Academy

कराड | कोळे (ता. कराड ) येथील संत घाडगेनाथ पायी दिंडीचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात पालखी सोहळ्याला प्रारंभ केला. खांद्यावर ध्वज पताकाधारी वारकरी, भजनात तल्लीन टाळकरी, तुलसी वृदांवन डोक्यावर घेतलेल्या महिलांच्या सहभागाने गावचे वातावरण अवघे भक्तीमय बनले होते. पालखीच्या दर्शनासाठी अणि सोहळ्याला निरोप देण्यासाठी भाविकांची उपस्थीती लक्षणीय ठरली. पहिला विसावा असलेल्या घारेवाडी येथे मेंढराचे रिंगण पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Kota Academy Karad

कराडसह पाटण तालुक्यातील भाविक वर्गात श्री. संत घाडगेनाथ पायीदिंडीचे मोठे महत्व आहे. आषाढी वारीला प्रतिवर्षी दिंडी पंढरपूरला जाते. दीडशे वर्षापासूनची परंपरा असून गावकऱ्यांनी ती पुढे सुरू ठेवली आहे. त्यामागे श्रध्दा जपली आहे. शुक्रवारी तेथील कोष्ठी आळीत दिंडीचा पहिला मुक्काम झाला. दुतर्फा रागोंळीच्या पायघड्यावरून चालत दिंडीचा पुढचा प्रवास सकाळी सुरू झाला. शिंगणवाडीत दुसऱ्या मुक्काम झाला. ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषात पायीदींडीचे पुन्हा सकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रयाण सुरू झाले.

घारेवाडीत नेहमीच्या ठिकाणी पहिला विसावा झाला. त्याठिकाणी प्रसाद वाटप झाले. त्यानंतर मेंढराचे गोल रिंगण झाले. ते भाविकाचे आकर्षणाचा विषय बनले. ऊन्ह सावल्याच्या खेळात विंग परिसरात दिंडीचे उत्साहात आगमन झाले. डोळे भरूनी सोहळा पाहण्यासाठी अणि दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. महिलांची संख्या त्यात लक्षणीय होती. श्रध्देपोठी कुणी प्रसाद वाटप केले. टाळ मृदगांच्या गजरात श्री. च्या जयघोषात दिंडी दुपारी येथुन पुढे मार्गस्थ झाली. दिंडीसोबत चार पाऊले चालुन अनेकांनी श्रध्दा अर्पण केली. कराडचे नूतन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी प्रारंभी दिंडी सोहळ्याला भेट देऊन दर्शन घेतले. दिंडीला मदत करणाऱ्या सर्वच सेवकांचा सन्मान संत घाडगेनाथ रथोत्सव व पालखी सोहळा समितीने यावेळी केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close