ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसांगलीसातारा

कृष्णा सरिता महिला बझारच्या चेअरमनपदी प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांची बिनविरोध निवड

कराड | विशाल वामनराव पाटील
कृष्णा सरिता महिला सहकारी घाऊक – किरकोळ खरेदी विक्री संघ अर्थात कृष्णा सरिता महिला बझारची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत संस्थेच्या चेअरमनपदी प्रा. डॉ. स्नेहल मकरंद राजहंस यांची, तर व्हाईस चेअरमनपदी श्रीमती संगीता संजय शेटे यांची निवड करण्यात आली. कृष्णा सरिता महिला बझारचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले व सौ. उत्तरा भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी एफ. एस. गावित यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीही बिनविरोध पार पडल्या.

Kota Academy Karad

नूतन संचालक मंडळात प्रा. डॉ. स्नेहल मकरंद राजहंस, श्रीमती संगीता संजय शेटे, सौ. वैशाली रवींद्र पवार (गोंदी), सौ. स्मिता जयवंतराव पाटील (शेणोली), सौ. अलका प्रसाद पालकर (कराड), सौ. अर्चना प्रकाश घाडगे (कराड), सौ. रेखा शिवाजी जगताप (वडगाव हवेली), सौ. शारदा मानसिंग जाधव (दुशेरे), सौ. जयश्री दिलीपकुमार सोमदे (रेठरे बुद्रुक), सौ. सुजाता जयवंत तलबार (ओंड), सौ. विमल लालासो जाधव (वाठार), सौ. अस्मिता अभिजीत पाटील (कोयना वसाहत), सौ. कल्पना कांतीलाल भोसले (आगाशिवनगर), सौ. आक्काताई दिलीप पवार (मालखेड), सौ. पुष्पा नारायण काळोखे (चचेगाव), सौ. रजनी अशोक गुरव (कोयना वसाहत), सौ. वैशाली अशोक गावडे (रेठरे खुर्द) यांचा समावेश आहे.

Brilliant Academy

नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमनसह संचालक मंडळ सदस्यांचा सत्कार डॉ. सुरेश भोसले व सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. नव्या संचालक मंडळाने आपल्या कार्यातून कृष्णा सरिता बझारच्या नावलौकिकात भर घालावी, असे प्रतिपादन डॉ. भोसले यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणातून केले. दरम्यान, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker