Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कोळेवाडीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

कराड | कोळेवाडी (ता. कराड) येथे एका 32 वर्षीय युवकाने आत्महत्या केलेल्या घटनेची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. तेजपाल अशोक पोतेकर (वय- 32, रा. कोळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.Brilliant Academy

तेजपाल पोतेकर याने ओढ्याकडेला झाडास गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत प्रकाश बापूराव भोसले यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.Kota Academy Karad

पोलिसांनी सांगितले की, कोळेवाडी येथील ‘पन्हाळी’ नावाच्या ओढ्याकडेला युवकाने गळफास घेतल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील उषा पाटील यांना दिली. त्यानंतर तालुका पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close