Hello News 2026 Sunil Bamane ADVT
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

वारूंजी येथे खोली भाड्याने घेवून वेश्या व्यवसाय : सांगली जिल्ह्यातील महिलेसह दोघांना अटक

कराड | भाडेतत्वावर खोली घेऊन त्याठिकाणी कुंटणखाना चालविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून एका महिलेची सुटका केली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वारुंजी (ता. कराड) येथे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. विलास बजरंग शिवसागर (वय- 47, रा. ताकारी, ता. वाळवा) याच्यासह अन्य एका महिलेचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. सदरील महिला ही वाळवा तालुक्यातील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारुंजी फाटा येथे विलास शिवसागर याच्यासह एका महिलेने भाडेतत्वावर खोली घेतली होती. त्या खोलीमध्ये गत 25 दिवसांपासून त्यांनी एका महिलेला आश्रयाला ठेवले होते. स्वत:च्या आर्थीक फायद्यासाठी विलास शिवसागर व त्याची साथीदार महिला आश्रयाला ठेवलेल्या महिलेला वेश्या व्यवसाय करायला लावत होती. ग्राहकांकडून दीड हजार रुपये ते घेत होते.

याबाबतची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आश्रयास असलेल्या महिलेची सुटका करुन विलास शिवसागर याच्यासह त्याच्या साथीदार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसागर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे. पोलीस निरीक्षक मारुती सरोटे तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close