Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यसातारा

खडी क्रशर मालकांना दणका : म्हसवड, दहिवडी येथील 6 जणांवर गुन्हा

दहिवडी | प्रशासनाने बंद केलेले खडी क्रशर पुन्हा परवानगीशिवाय सील तोडून सुरू केल्याबद्दल दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 3 आणि म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 3 अशा सहा खडी क्रशर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खडी क्रशर मालकांच्यात खळबळ माजली आहे.

तहसीलदारांनी 5 मार्च 2020 रोजी कारवाई करून माण तालुक्यातील सहा खडी क्रशर कारवाई करून मोहोर बंद केले होते. मात्र, ही लावलेली मोहोर खडी क्रशर निवृत्ती साहेबराव फडतरे (गोंदवले खुर्द), विवेक तानाजी कट्टे (गोदवले बुद्रुक) व रणजित लिंबाजी शिंदे (राणंद) यांची जाशी (ता. माण) येथील, तर इंजबाव येथील राजेंद्र पांडुरंग फडतरे, राजणी येथील धनाजी श्रीमंत दोलताडे व धुळदेव येथील बबन नामदेव वीरकर यांनी शासनाच्या आदेशाशिवाय स्वतः मोहोर तोडून खडी क्रशर सुरू केली, तसेच खडी क्रशरचा वापर केला. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोंदवले बुद्रुकचे मंडल अधिकारी भरत यशवंत कर्णे व मंडल अधिकारी सुनील रामप्रसाद खेडेकर यांनी 11 ऑगस्ट रोजी दहिवडी व म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सदरची कारवाई मंडल अधिकारी भरत कर्णे (गोंदवले बुद्रुक), सुनील खेडेकर (मार्डी) व किशोर शेंडे (म्हसवड) यांनी केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ व अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक श्री. काळेल, हेड कॉन्स्टेबल विठ्ठल वीरकर व पोलिस नाईक एम. एन. हांगे अधिक तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close