क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेप्रशासनराज्यसातारा

सातारा जिल्ह्यात 3 ठिकाणी दारूवर कारवाई

कराड, पाटण व खंडाळ्यात कारवाई

सातारा प्रतिनिधी । वैभव बोडके
सातारा जिल्ह्यातील खंडाळा, कराड व पाटण तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एकूण 980 लिटर हातभट्टी दारु, 25 बॉक्स गोवा बनावट दारु, दोन चाकी वाहने, एक सहाचाकी वाहन असा तब्बल 22 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे अवैध हातभट्टी दारुची चोरटी वाहतूक करण्यात येत होती. तर कराड- चिपळूण मार्गावर गोपाटवाडी (ता. पाटण) येथे कारवाई करण्यात आली.

शिंदेवाडी (ता. खंडाळा) परिसरात हातभट्टी वितरीत करणारा व्यक्ती राहुल जितेंद्र कुंभार (रा. नायगांव ता. भोर जि. पुणे) याच्या ताब्यातून एक चारचाकी वाहनासह 980 लिटर हातभट्टी दारूसह एकूण 2 लाख 56 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर कराडच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने चिपळून-कराड मार्गावर गोपाटवाडी (ता. पाटण) गावाच्या हद्दीत कराडच्या दिशेने चालणारी गोवा बनावट विदेशी दारूची वाहतूक पकडून एक चारचाकी व एक सहाचाकी वाहनांसह 19 लाख 75 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कराड व पाटण तालुका परिसरात गोवा बनावट दारुचा पुरवठा करणारे गोरखनाथ बाबुराव पवार (रा. बेलवाडे खुर्द, ता. पाटण), प्रदीप कृष्णात सलते (रा. सलते पो. बीबी ता. पाटण) व दिनेश दगडू कदम (रा. वालोपे, ता. चिपळूण, जि.रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी व विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क किर्ती शेडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरारी पथक सातारा, फलटण यांच्या संयुक्त पथकाने आज कारवाई केली. यामध्ये निरीक्षक माधव चव्हाण, महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रशांत नागरगोजे सहा दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, सचिन खाडे, जवान सागर आवळे, अजित रसाळ, किरण जंगम, आप्पासो काळे, सुरेश अब्दागिरे, मनिष माने, राजेंद्र आवघडे, आबासोब जानकर, विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे यांनी सहभाग घेतला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close