Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिकसोलापूर

कराडला अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा शुभारंभ

पहिल्या शाखेचा सोमवारी भव्य शुभारंभ

कराड : – अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूरच्या कराड शाखेचा शुभारंभ सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता समर्थ प्राईड, शाहू चौक, कराड येथे संपन्न होणार आहे. या प्रसंगी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व हितचिंतकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

या शुभारंभ समारंभास गुरुवर्य १०८ प. पु. श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज (मठाधिपती, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव) यांच्या शुभहस्ते पूजन होणार आहे. तसेच प. पु. शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज (महालिंगेश्वर मठ संस्थान, करवडी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या विशेष प्रसंगी अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अॅड. जनार्दन लक्ष्मण बोत्रे तसेच संचालक, सल्लागार, ठेवीदार, खातेदार, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.

शिवसमर्थ परिवाराचे कुटुंब प्रमुख अॅड. जनार्दन बोत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज चालणार आहे, अशी माहिती संस्थेचे महाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी दिली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close