ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक

इनरव्हील क्लब ऑफ मलकापूर सनराइजच्या अध्यक्षपदी छाया शेवाळे

सेक्रेटरी पदी चित्रा रामदुर्गकर यांची निवड

कराड :- इनरव्हील क्लब ऑफ मलकापूर सनराइज् अध्यक्षपदी छाया शेवाळे तर सेक्रेटरी पदी चित्रा रामदुर्गकर यांची निवड करण्यात आली. क्लब यावर्षी पाचव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. कोरोना सारख्या अतिगंभीर आणि संवेदनशील काळामध्ये क्लबची स्थापना चार्टर प्रेसिडेंट छाया शेवाळे यांनी केली. काही मैत्रिणींच्या मदतीने क्लब पाचव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे.

सामाजिक सेवेमध्ये सर्व स्तरावर काम करून कौतुकाची थाप मिळवली आहे. थोड्याच कालावधीत नावारूपाला आलेला आणि आपली वेगळी ओळख निर्माण केलेला क्लब म्हणून ओळख. नेहमीच समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचण्याचा मागील चार वर्षात प्रयत्न केलेला आहे यापुढे ही अशीच क्लब ची वाटचाल सुरू राहील असं अध्यक्षांनी आणि त्यांच्या सर्व क्लब अधिकाऱ्यांनी सांगितलं.

यावर्षी क्लबच्या अध्यक्षपदी सौ. छाया शेवाळे, सेक्रेटरी चित्रा रामदुर्गकर, पी. पी. निर्मला वीर, व्हॉइस प्रेसिडेंट वैशाली अशोक पाटील, ट्रेझरर वैशाली लक्ष्मण पाटील, आय. एस. ओ. सीमा पाटील, एडिटर रेखा राजगडकर , सी. पी. सी वैदही कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. एक्झिक्यूटिव्ह कमिटी साक्षी पाटील, आशा माने, वैशाली गुरुप्रसाद पाटील, विजया फडतरे तर डेव्हलपमेंट ऑफिसर पल्लवी पाटील, सुनिता चव्हाण, सुनीता पाटील, स्वप्नाली पाटील यांची निवड करण्यात आली.

क्लब तर्फे निसर्ग संवर्धन, आरोग्य, शैक्षणिक, महिला विषयी जनजागृती, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker