प्राना फाउंडेशनच्या अध्यक्षा डाॅ. प्राची पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा
ढेबेवाडी विभागात मुलांना शालेय साहित्य, रूग्णांना फळे वाटप

पाटण (हॅलो न्यूज) ः- ढेबेवाडी (ता. पाटण) येथील प्राना फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्राचीताई नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगर दऱ्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच ढेबेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच डाॅ. प्राचीताई पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांतील मुलांसोबत केक कापून आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला.
यावेळी शुभदा पाटील, साधना कोळेकर, उज्वला पाटील, सपना पाटील, आशा सदामत, सीमा गोसावी, सुवर्णा मराठे, स्वाती उंडे, वैशाली मराठे, जयश्री पाचपुते, कमल पाटील, मालन पाटील, शारदा कदम यांच्यासह शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ढेबेवाडी भागातील यादववाडी, शेडेवाडी, जाैंजाळवाडी, आंब्रुळवाडी, शितपवाडी, मुंद्रुळकोळे, साबळेवाडी, जाधववाडी, पानवळवाडी, उमरकांचन, भांवुचीवाडी, सावंतवाडी, जिंती, शिंगमोडेवाडी, सुतारवाडी, मराठवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळांतील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.



