आनंदराव चव्हाण पतसंस्थेचा २०० कोटी व्यवसायाचा टप्पा पार : चेअरमन अभिजीत पाटील
आनंदराव चव्हाण व जोगेश्वरी महिला पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

पाटण (हॅलो न्यूज):- संस्थेची सुरक्षितेता ही सभासद व ठेवीदारांच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्यासाठी संस्थेने चांगल्याप्रकारे तरतुदी केल्याने संस्था भक्कम स्थितीत उभी आहे. संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील यांनी ग्रामीण भागात स्थापन केलेल्या या संस्थेने आपली ओळख जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता नवी मुंबई सारख्या ठिकाणी संस्थेने पाऊल टाकले असून २०० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
आनंदराव चव्हाण पसंस्थेची ३२ वी व जोगेश्वरी महिला पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील, जोगेश्वरी महिला पतसंस्थेच्या चेअरमन मंदाकिनी पाटील, व्हा चेअरमन सुभाष बाटे, आर. बी. पाटील, बबनराव सुर्यवंशी, सदाशिव कदम, पंढरीनाथ खबाले, हणमंत कदम, सर्जेराव पाटील, पांडुरंग पुजारी, दिनकर साखरे, शारदा गरुड, वासंती पाटील, जोगेश्वरी पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन आश्विनी पाटील, मेघाराणी पाटील, शकुंतला कदम, शालन जाधव, सुरेखा काळे, शुभांगी पाटील, सिंधुताई कुंभार, मनिषा मोरे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले, ३२ वर्षापूर्वी ढेबेवाडी सारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या या संस्थेला पुणे व नवीमुंबई सारख्या ठिकाणी शाखा विस्तार करण्यास मंजूरी मिळाली आहे. लवकरच सैदापूर, कराड, पुणे आणि घणसोली नवीमुंबई या ठिकाणी शाखा विस्तार करण्यात येणार आहे. सभासद हा संस्थेचा मालक आहे. त्यामुळेच संस्था आणि सभासद यांचे अतुट नाते निर्माण झाले आहे. या नात्याला तडा जावू न देता संस्थेची विश्वाहर्ता कायम राखली जाईल. आज संस्थेच्या स्वमालकीच्या सात ठिकाणी शाखा कार्यरत आहेत. सर्व शाखामध्ये कोअर बँकिग पध्दतीने कामकाज सुरू आहे.
हिंदुराव पाटील म्हणाले, आनंदराव चव्हाण पतसंस्थेने सहकार क्षेत्रात काम करत असताना सभासद हा संस्थेचा केंद्रबिंदू मानून काम केले. गेल्या बत्तीस वर्षात संस्थेमध्ये राजकारणा विरहित कामकाज सुरू आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात संस्थेची वेगळी ओळख आहे. अभिजीत पाटील यांनी संस्थेच्या कामकाजात बदल घडवून नवनवीन धोरणे राबवून संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेले.त्यामध्ये संचालक मंडळ, सल्लागार व कर्मचाऱ्यांचे योगदान आहे.
विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.गेली ३२ वर्षापासूनची ही परंपरा संस्थेने कायम जपली आहे.तसेच संस्थेने सभासदांना ८% लाभांश जाहीर करुन लगेच ऑनलाईन पध्दतीने वार्षिक सभेत सभासदांच्या खात्यावर जमा केला..
संस्थेकडे ११५ कोटी ठेवी,८० कोटी ५० लाख कर्ज वितरण, वसूल भागभांडवल ३ कोटी ५८ लाख ८०हजार,संस्थेची गुंतवणूक ३३ कोटी ७ लाख ९७ हजार,संस्थेचा निधी ३ कोटी १५ लाख ७३ हजार,८० लाख ५० नफा तर ७हजार ८३२ सभासद आहेत.
आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे व्यवस्थापक सुहासचंद्र पाटील व जोगेश्वरी महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक दादासाहेब साळुंखे यांनी अहवाल वाचन केले.तर अरुण यांनी आभार मानले.कार्यक्रमास सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐतिहासिक तासगाव संस्थानच्या गणपती रथोत्सवात मंत्री शंभूराज देसाई यांच्या पायाला दुखापत



