अभिनंदन : कराडच्या श्रीयांश फणसाळकर यांची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

कराड (हॅलो न्यूज):- रयत शिक्षण संस्थेच्या, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराडमधील श्रीयांश निलेश फणसाळकर या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दि. १९ व २० ऑक्टोबर, २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, सांगली याठिकाणी संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय शासकीय बॅडमिंटन स्पर्धेत महाविद्यालयातील १९ वर्षाखालील खेळाडू श्रीयांश निलेश फणसाळकर- इ. १२ वी कला याने प्रथम क्रमांक पटकाविला.
त्याच्या यशस्वी कामगिरीमुळे त्याची राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. रवींद्र भाऊ पवार, ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख प्रा.हणमंतराव मांडके, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा.डॉ. उत्तम मोरे तसेच कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. रामचंद्र व्हनबट्टे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.माधुरी कांबळे तसेच महाविद्यालयातील सिनिअर ज्युनिअर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिमखाना विभाग प्रमुख प्रा.डॉ.विद्या पाटील, प्रा.सचिन चव्हाण, प्रा.अमित पोळ, प्रा रणजीत पाटोळे या सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिपंढरपूर कोळेत ज्ञानेश्वरी पारायणाचा सुवर्णमहोत्सव : संत घाडगेनाथ महाराजांचा १६२ वा समाधी सोहळा



