kota acadamy karad
कोल्हापूरताज्या बातम्यापर्यटनपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमुंबईराज्यसांगलीसातारा

दररोज विमानसेवा हालचाली वाढल्या : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांना गुडन्यूज

कोल्हापूर। कोल्हापूर- मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. तशा हालचाली सुरू असून ऑक्टोबर महिन्यापासून या मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे. तसेच दिवस- रात्र अशी दोन्ही सत्रात विमानसेवा सुरू करण्याची मागणी होवू लागल्याने त्याला यश येते का याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष आहे.

कोल्हापूर- मुंबई मार्गावर सध्या आठवड्यातून चार दिवस सेवा सुरू आहे. आता ही सेवा नियमित करण्याची मागणी सातत्याने होत आहे. केवळ दैनंदिनच नव्हे, तर सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रांत विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे. मात्र, तांत्रिक कारणास्तव अद्याप या मागणीला यश येताना दिसत नाही.

सध्या असलेली कोल्हापूर- मुंबई विमानसेवा दररोज सुरू करण्यासाठी हालचाली सुरू असून, ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष आठवड्यातून सातही दिवस कोल्हापूर- मुंबई मार्गावर विमानसेवा उपलब्ध होईल. तांत्रिक कारणास्तव जून महिन्यापुरती बंद करण्यात आलेली कोल्हापूर- अहमदाबाद विमानसेवा दोन महिने बंदच आहे. त्यामुळे कोल्हापूर- अहमदाबाद विमानसेवा केव्हा सुरू होणार याकडे प्रवाशी डोळे लावून बसले आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूर- मुंबई दररोज विमानसेवा हालचाली सुरू झाल्याने प्रवाशांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close