परंपरा 20 वर्षाची : कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा दहावीचा निकाल 100 टक्के

कराड :- कराड येथील ज्ञानांगण एज्युकेशन सोसायटी संचलित कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल १०० % लागला. गेल्या 20 वर्षांची परंपरा अबाधित ठेवली आहे.
इयत्ता दहावी मधील कु. तनया हृषीकेश कुलकर्णी हिने ९७.४०% मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, कु. आर्या आबासो साठे हिने ९६.२० % टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला व कु. वेदश्री दत्तात्रय चव्हाण हिने ९४.४० % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.तसेच कु.सिद्धेश रवींद्र जाधव ह्याने ९२.२० % गुण मिळवले, कु. झरीन शकील कारभारी हिने ९१.४० % गुण मिळवले, कु.अक्षया प्रशांत थोरात हिने ९१.०० % गुण मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानांगण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे, उपाध्यक्ष मंजिरी खुस्पे, संचालिका मैथिली खुस्पे, सचिव सतीश पाटील, कॉलेजच्या प्राचार्या जयश्री पवार व उपप्राचार्य सना संदे, बिश्वदीप बॅनर्जी, जितेंद्र कुमार, सारिका पाटील, सुजाता पवार व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.