कृषीक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

BREAKING NEWS : सुपनेत भरदिवसा बिबट्याचा हल्ल्यात 4 शेळ्या ठार

कराड | पश्चिम सुपने (ता. कराड) गावच्या हद्दीतील पवार मळा येथे भरदिवसा बिबट्याने शेडात बांधलेल्या शेळ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुपने गावातील शेतकऱ्यांच्या 4 शेळ्या जागीच ठार झाल्या. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यावेळी उडालेल्या गोंधळामुळे शेडात एका महिलेने धाव घेतली तेव्हा तिला समोरच एक बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली.

Kota Academy Karad

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- पाटण मार्गावर सुपने व पश्चिम सुपने ही दोन्ही गावे आहेत. या दोन गावातील शेतकऱ्यांची शेती ही पवार मळा या ठिकाणी आहे. सुपने येथील राजू साहेबराव पवार यांचेही शेड पवार मळा येथे आहे. या शेडात शेळ्या बांधलेल्या होत्या, या शेळ्यांवर आज दुपारी 12 बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये 4 शेळ्या ठार केल्या आहेत.

बिबट्याने शेळ्यावर हल्ला केल्याने शेजारीच्या शेडात असलेल्या वैशाली सचिन पवार या आवाजाच्या दिशेने धावल्या. परंतु यावेळी शेडातून बिबट्या त्यांना बाहेर पडताना दिसला. त्यानंतर आजूबाजूचे शेतकरी हे राजू पवार यांच्या शेडाकडे आले असता, त्यांना शेळ्या मृत्यूमुखी पडल्याचे पहायला मिळाले. या घटनेनंतर कराड वनविभागाचे अमोल महाडिक, पोलिस पाटील कमलेश कोळी यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेण्यास सुरूवात केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close