क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Satara News : विनापरवाना देशी गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या युवकाला अटक

कराड | विनापरवाना देशी बनावटीचे गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने कराडात आलेल्या युवकाला पोलिसांनी अटक केली. ईदगाह मैदान परिसरात साई मंदिरासमोर रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. संशयीताकडून पोलिसांनी 60 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व मॅगझिन जप्त केले आहे. मनोज राजेंद्र खांडेकर उर्फ एमके (वय 23, रा. जुळेवाडी, ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, देशी बनावटीचे गावठी पिस्तूल घेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने युवक कराडमध्ये येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राजू डांगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी सापळा लावला. संशयित युवक साई मंदिरासमोर लक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर ईदगाह मैदान परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार त्यांनी रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून संशय युवकाला ताब्यात घेतले.

अचानक पोलिसांनी पकडल्याने संशयित कावराबावरा होऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडून ठेवले. जागेवरच त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ साठ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व मॅगझिन पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार देसाई, संजय जाधव, संतोष पाडळे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार, देशमुख, सांडगे यांनी ही कारवाई केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker