आकाईवाडी येथे आरोग्य शिबिर संपन्न

कराड :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या सहकार्यातून कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून कराड तालुक्यातील आकाईचीवाडी येथीलमहादेव मंदिर येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले.
बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना २ लाख रुपयांपर्यंत दवाखान्यातील सर्व बिल माफ होणार आहे. शिबिरात सहभागी झालेल्या ग्रामस्थांची आरोग्य, रक्त तपासणी करण्यात आली.
यावेळी सर्वांना आरोग्य कार्ड वितरित करण्यात आले, याप्रसंगी भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील, भाजपा कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.दादासो उमराणी, येळगाव जिल्हापरिषद समन्वयक श्री.सचिन साळुंखे, श्री.सागर पाटील, श्री.अजित पाटील, श्री.अधिक कापसे, श्री.मोहन चिकले, श्री.अजिंक्य शेवाळे, तानाजी पवार, बांधकाम कामगार विभागाचे अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.



