Shekar Patil Maqheshwari Infra 1
ताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामुंबईराज्यसातारासामाजिक

हभप बाबा महाराज सातारकर यांचे निधन

मुंबई | ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं ८९ व्या वर्षी निधन झालं आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाने धार्मिक साप्रदाय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी ३ वाजेनंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येईल. उद्या म्हणजेच शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाबा महाराज सातारकर त्याच्या अमृतवाणीने महाराष्ट्रासह देशभरातच नव्हे तर जगभरात प्रसिध्द होते. त्यांनी किर्तन सेवेसाठी आपले आयुष्य खर्ची केले. त्याच्या निधनाने सातारा जिल्ह्यासह वारकरी संप्रदायातून शोक केला जावू लागला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close