Shekar Patil Maqheshwari Infra 1
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराड- विटा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध जागीच ठार

कराड | कराड ते विटा मार्गावर ओगलेवाडी येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द जागीत ठार झाला. उत्तम खाशाबा आडके (वय- 62, रा. बाबरमाची, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत नसरुद्दीन महंमद शेख यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ओगलेवाडी येथील सुर्यवंशी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नसरुद्दीन शेख यांना सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अपघाताचा आवाज आला. त्यामुळे तातडीने त्यांनी खाली जाऊन पाहिले असता, कराड ते विटा जाणाऱ्या रस्त्यावर मध्यभागी एक वृद्ध रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याबाबतची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यात दिली.

अपघातानंतर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी आले. त्यांनी पाहिले असता संबंधित वृद्धाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. या अपघातप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close