ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगराजकियराज्य

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे | भाजप जेष्ठ नेते व खासदार गिरीष बापट यांचे आज वयाच्या 72 व्या वर्षी पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी निधनाची बातमी दिली आहे.

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. गिरीश बापट यांनी 1995 मध्ये आमदारकीची पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले.

पुण्यात कसबा पेठेत गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकीत ऑक्सिजन पाईप लावून गिरीश बापट यांना प्रचारासाठी आणले होते. यावेळी भाजपावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. गिरीश बापट हे भाजपाशी एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याचे या निमित्ताने दिसून आले. पुण्यातील भाजपाचा एक खंबीर नेता हा हरपला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close