उद्योजक सुनिल बामणे वाढदिवस विशेष : जिल्हा परिषद शाळांना स्पोर्टसचे साहित्य वाटप

कराड (हॅलो न्यूज)- जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गुणवंत असून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील दानशून लोकांनी ग्रामीण भागातील शाळांना सामाजिक भावनेतून मदत करणे गरजेचे आहे. उद्योजक असलेले सुनिल बामणे यांनी नेहमीच सामाजिक भावनेतून सुपने- तांबवे परिसरासह गरजूंना मदतीचा हात दिला आहे. याच भावनेतून आज स्पोर्टसचे साहित्य वाटप करण्यात येत असल्याचे केसे गावचे सरपंच प्रदिप शिंदे यांनी सांगितले.

उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते सुनिल बामणे यांनी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांना क्रिकेटचे साहित्य, फुटबाॅल आणि खाऊ वाटप करण्यात आले. तांबवे- सुपने भागातील पाठरवाडी, डेळेवाडी, उत्तर तांबवे, साजूर, गमेवाडी, म्होप्रे, पश्चिम सुपने, केसे, विजयनगर, तांबवे व दक्षिण तांबवे शाळेत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय उर्फ रवी ताटे, उद्योजक सुनिल बामणे, सरपंच प्रदिप शिंदे, माजी सरपंच आबासाहेब पवार यांच्या हस्ते साहित्य शाळांना सुपूर्द करण्यात आले. पाठरवाडी येथे उदय यादव, हणमंत यादव, अशोक यादव, यश यादव, गणेश यादव, तांबवे येथे केंद्रप्रमुख आनंदा धायगुडे, पोलिस पाटील शशिकांत चव्हाण, मुख्याध्यापक अमित फल्ले, भाऊसाहेब धायगुडे, साजूर येथे उपसरपंच संदिप पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बलराज चव्हाण, मुख्याध्यापक पांडुरंग माने, म्होप्रे येथे वसंत शिंदे, विकास संकपाळ उपस्थित होते.


गमेवाडीचे माजी सरपंच भास्करराव यादव, शैलेश शिंदे, हिम्मतराव देसाई, डेळेवाडीचे माजी सरपंच तात्यासाहेब बाबर, विद्यमान सरपंच साै. बाबर, केसे येथे उपसरपंच तटामुक्ती अध्यक्ष जयसिंग शिंदे, शिवाजीराव शिंदे, सुनिल पाटील, अशोक शिंदे, दिपक पाटील, तांबवे येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर पाटील, निलेश भोसले, मुख्याध्यापक श्री. काटकर सर, माजी सरपंच आनंदराव ताटे, कलाकार वासू पाटील, दक्षिण तांबवे येथील शाळेत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोगरे, विलास पाटील, मुख्याध्यापक आबासाहेब साठे आदी उपस्थित होते.



